Join us

"सलमान खानला भेटायचं राहिलं...", KBC मध्ये स्पर्धकाने बिग बींसमोर व्यक्त केली इच्छा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:35 IST

अमिताभ बच्चन यांच्या उत्तरानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.

'कौन बनेगा करोडपती' (KBC) च्या सेटवर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्पर्धकांसोबत गप्पा गोष्टी करत असतात. अनेकदा स्पर्धकांची चेष्टा करतात. त्यामुळे केबीसी पाहताना मजा येते. अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. कित्येक सदस्यांची बिग बींना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. दरम्यान एका महिलेने अमिताभ बच्चन यांच्यासमोरच सलमान खानला (Salman Khan) भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली. यावर बिग बींची काय रिअॅक्शन होती बघा.

'केबीसी'चा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये हॉटसीटवर बसलेली महिला बिग बींना म्हणते, 'तुम्ही माझे आवडते अभिनेते आहात तुम्हाला भेटण्याची इच्छा तर पूर्ण झाली. पण अजून सलमान खानला नाही भेटता आलं. तुम्ही सलमानचे मित्र आहात कदाचित तुमच्या माध्यमातून माझं हेही स्वप्न पूर्ण होईल.' यावर अमिताभ बच्चन म्हणतात, "मला  माहितच नव्हतं की तुम्ही सलमानच्या इतक्या मोठ्या चाहत्या आहात. माहित असतं तर नक्कीच काही ना काही प्रयत्न केले असते. पण आम्ही  तुमचं म्हणणं सलमानपर्यंत नक्की पोहोचवू."

अमिताभ बच्चन आणि सलमान खान बऱ्याच काळापासून एकत्र दिसलेले नाहीत. याआधी त्यांनी 'गॉड तुसी ग्रेट हो','बागबान','बाबूल' या सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्याचा सलमान एक्स बॉयफ्रेंड आहे. त्यामुळे अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नानंतर सलमान आणि अमिताभ बच्चन पुन्हा फारसे कधी एकत्र दिसले नाहीत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनसलमान खानकौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजनबॉलिवूड