Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kaun Banega Crorepati 12: ‘केबीसी’साठी अमिताभ बच्चन यांनी वाढवली फी, घेणार इतके कोटी?

By रूपाली मुधोळकर | Updated: September 28, 2020 17:17 IST

पुन्हा एकदा केबीसी; चर्चा हीच

ठळक मुद्देकौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोचे 12 वे सीझन आजपासून सुरु होत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चे 12 वे सीझन आज पासून सुरु होतेय. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक वर्षांपासून महानायक अमिताभ बच्चन हा शो होस्ट करत आहेत. सूत्रसंचालक म्हणून त्यांनी या शोला एका वेगळ्या उंचीवर नेले, एक वेगळी ओळख दिली. आपल्या खास शैलीत स्पर्धकांशी संवाद साधत ‘कौन बनेगा करोडपती’ला एक नवं परिमाण मिळवून दिले. अनेक लोक तर केवळ अमिताभ बच्चन यांना भेटण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केबीसीत येतात. केबीसी या शोने अनेकांना ‘करोडपती’ केले. पण लोकांना ‘करोडपती’ बनवणाºया या शोसाठी अमिताभ बच्चन किती फी घेतात माहितीये?

रिपोर्टनुसार, अमिताभ केबीसीच्या एका एपिसोडसाठी 3 ते 5 कोटी रूपये घेतात. गतवर्षी केबीसी सुरु होण्यापूर्वी अनेक बातम्या आल्या होत्या. अमिताभ केबीसीच्या एका एपिसोडसाठी 2 कोटी घेतात, असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला होता. यावर्षी त्यांच्या मानधनाच्या रकमेत साहजिकच वाढ झाली आहे. या सीझनच्या एका एपिसोडसाठी बिग बी 3 ते 5 कोटी घेत असल्याचे कळतेय. अर्थात याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र चर्चा हीच आहे.या सीझनमध्ये 70 च्या जवळपास एपिसोड असतील तर अमिताभ या सीझनमधून सुमारे 250 कोटी रूपये चॅनलकडून घेऊ शकतात.

3 वर्षांपासून थ्री-पीस सूट!!कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोचे 12 वे सीझन आजपासून सुरु होत आहे. केबीसी 12च्या सेटवर फास्टेस्ट फिंगर टेस्ट राऊंड खेळणा-या सर्व स्पर्धकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका हॉटेलात क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोबत हा राऊंड खेळणा-यांची संख्या यावेळी कमी करून 8 करण्यात आली आहे. यंदाचे केबीसीचे 12 वे सीझनही महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. नेहमीप्रमाणे देवियों और सज्जनों, तालियों की गडगडाहट के साथ स्वागत किजीऐ... हे त्यांचे शब्द केबीसीच्या निमित्ताने घराघरात घुमणार आहेत. पण   तुम्ही एक गोष्ट कधी नोटीस केली? ती म्हणजे अमिताभ केबीसीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून एकाच स्टाईलचा सूट कॅरी करत आहेत. होय, गेल्या 3 वर्षांपासून थ्री-पीस सूटमध्येच बिग बी केबीसी होस्ट करत आहेत.

केबीसीमध्ये बिग बी यांची स्टाइलिस्ट प्रिया पाटीलने याबद्दल सांगितले. तिने सांगितले, केबीसी हा शो संध्याकाळचा शो आहे आणि शोच्या प्रारूपानुसार बिग बींसाठी गेल्या तीन वर्षांपासून थ्री पीस सूट वापरत आहेत. हे कपडे ते खूप चांगल्याप्रकारे कॅरी करतात. या सीझनमध्येही मी त्यांच्यासाठी ब्लॅक, वाईन अशा रंगाचा वापर करतेय. मिस्टर बच्चन यांना क्लासी ड्रेस आवडतात. मात्र नव्या गोष्टी ट्राय करण्यासाठीही तयार असतात. गेल्यावर्षी मी त्यांना टायची कल्पना दिली आणि त्यांनी ती स्वीकारली. यावर्षी अमिताभ कॉलर पिंस आणि ब्रोचचा वापर करताना दिसतील.

कम्प्युटर महाशय, जयाजी को लॉक किया जाए...! अमिताभ यांनी शेअर केले फोटो, भडकले लोक

पाच कोटी जिंकले, पण जीवनातील सुख-समाधान गेले, KBCमधील विजेत्याची व्यथा

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन