Join us

लहानपणी कॅटरिना कैफ स्वप्नांमध्ये रमायची !

By admin | Updated: July 12, 2017 02:20 IST

लहानपणी प्रत्येक जण काल्पनिक दुनियेत हरवून जात असतो;

लहानपणी प्रत्येक जण काल्पनिक दुनियेत हरवून जात असतो; याला बॉलिवूडची अभिनेत्री कॅटरिना कैफ ही देखील अपवाद नाही. तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमात तिने याविषयीचा उलगडा केला. कॅटरिनाने म्हटले की, ‘लहानपणी मी स्वप्नांमध्ये रमत असे. मला कॉमिक बुक वाचायला आणि लहान मुलांवर आधारित चित्रपट बघायला खूप आवडत असे. वास्तविक ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात कॅटरिनाची भूमिका काहीशी मुलांसारखीच आहे. मला संगीत ऐकायला खूप आवडत असे. त्याशिवाय मला संगीतमय चित्रपट बघायला आणि मनातील गुजगोष्टींमध्ये रमायला आवडत असे. मला असे वाटते की, त्यामुळे मी माझ्याच जगतात हरवलेली असायची. कारण, त्यावेळी मी खूप कल्पना करायची. त्यामुळेच कदाचित मी आज अभिनेत्री झाली असेल, असेही कॅटने म्हटले. पुढे बोलताना कॅटने म्हटले की, कॉमिक बुकबरोबरच मला ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बिस्ट’, ‘मॅरी पॉप्पिंस’ आणि ‘द साउंड आॅफ म्युझिक’ यांसारखे संगीतमय चित्रपट बघायला खूप आवडत असतं.’