Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरीच्या ७ दिवसानंतर कतरिना कैफला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:51 IST

Katrina Kaif And Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. अखेर या पॉवर कपलने चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली आहे. विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांना या आनंदाच्या बातमीची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे, कारण कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर सात दिवसांनी, गुरुवारी, १४ नोव्हेंबरच्या सकाळी कतरिना कैफला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.

कतरिना कैफ आणि विकी कौशलने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले. या जोडीने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर करताना लिहिले होते, आमच्या घरी आनंदाचं गाठोडं आलं आहे. खूप आनंद आणि उत्साहाने आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतो. ७ नोव्हेंबर २०२५, कतरिना आणि विकी." आता मुलाच्या जन्मानंतर सात दिवसांनी, गुरुवारी, १४ नोव्हेंबरच्या सकाळी कतरिना कैफला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.

गुरुवारी सकाळी कतरिना कैफला हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पाहिले गेले. अभिनेत्री आपल्या नवजात मुलासह गाडीत बसून घरासाठी रवाना होताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाम कौशल यांनी 'आजोबा' झाल्याबद्दल व्यक्त केलेला आनंदविकी कौशलचे वडील, शाम कौशल यांनी सोशल मीडियावर कुटुंबातील सर्वात नवीन आणि लहान सदस्याच्या घरी आगमनाबद्दल आपला आनंद व्यक्त केला होता. त्यांनी एका भावनिक नोटमध्ये लिहिले होते, "शुक्रिया रब दा (देवाचे आभार). कालपासून देव माझ्या कुटुंबावर इतका मेहरबान राहिला आहे की, मी जितके आभार मानू, ते त्यांच्या आशीर्वादासमोर कमी पडत आहेत. देव खूप दयाळू आहे. देवाची कृपा अशीच माझ्या मुलांवर आणि सर्वात 'ज्युनियर कौशल'वर कायम राहो. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत आणि स्वतःला खूप भाग्यवान समजत आहोत. आजोबा बनून खूप-खूप आनंद झाला आहे. देव सर्वांवर कृपा करो. देव रक्षण करो." तर, विकीचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशलने 'मी काका झालो.' म्हणत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

कतरिना-विकीने डिसेंबर २०२१ मध्ये बांधली लग्नगाठ कतरिना आणि विकीचे लग्न ९ डिसेंबर २०२१ रोजी एका खासगी पण भव्य समारंभात झाले होते. या जोडीने राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवाडा येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले होते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Katrina Kaif Discharged After 7 Days; Viral Video Surfaces

Web Summary : Katrina Kaif and Vicky Kaushal welcomed a baby boy. Katrina was discharged from the hospital on November 14th, seven days after giving birth. The couple married in December 2021 in Rajasthan.
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ