Join us

कतरिना जखमी

By admin | Updated: April 21, 2015 23:53 IST

आगामी ‘फितूर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घोड्यावरून पडून कतरिना कैफ जखमी झाली आहे. तिला किरकोळ दुखापत झाली आहे.

आगामी ‘फितूर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घोड्यावरून पडून कतरिना कैफ जखमी झाली आहे. तिला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र अपघातानंतरही तिने शूटिंग सुरू ठेवून त्या दृश्याचे चित्रीकरण पूर्ण केले. या अपघातात तिच्या मानेला आणि पायाला दुखापत झाल्याचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांना कळताच त्यांनी चित्रीकरण थांबविण्यास सांगितले. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कतरिनासोबत आदित्य रॉय कपूर असून, अभिनेत्री रेखाही मुख्य भूमिकेत आहे.