फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. यापूर्वीही त्यांच्या एकत्र काम करण्याबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या, पण सरतेशेवटी त्यांना एका चित्रपटाच्या ‘लूक टेस्ट’मध्ये सीलेक्ट करण्यात आलं आहे. याआधी या चित्रपटासाठी ‘पीके’फेम अनुष्का शर्माला पहिली पसंती देण्यात आली होती, पण बाजी मारली कतरिनाने. तेव्हा आता बघू या, ही जोडी रुपेरी पडदा कितपत गाजवते.
कतरिना आणि सिद्धार्थ एकत्र
By admin | Updated: January 12, 2015 01:08 IST