Join us

कॅटरिना आदित्यबरोबर गेली डिनर डेटला

By admin | Updated: October 4, 2016 14:52 IST

रणबीर कपूरने साथ सोडल्यानंतर सिंगल असलेल्या कॅटरिना कैफला एक नवीन मित्र भेटला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - रणबीर कपूरने साथ सोडल्यानंतर सिंगल असलेल्या कॅटरिना कैफला एक नवीन मित्र भेटला आहे. अभिषेक कपूरने दिग्दर्शन केलेल्या 'फितूर'च्या सेटवर दोघांची पहिली ओळख झाली. फेब्रुवारीच्या दुस-या आठवडयात प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. पण या चित्रपटानंतरही त्यांच्या मैत्रीत अंतर पडलेले नाही. 
 
कॅटरिनाच्या या नव्या मित्राचे नाव आहे आदित्य रॉय कपूर. ऑगस्ट महिन्यात ड्रीम टीमच्या कन्सर्टसाठी दोघे एकत्र गेले होते. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट, परिणीती चोप्रा, वरुण धवन, करण जोहरही त्यांच्या सोबत होते. 
 
दिवसेंदिवस त्यांच्यातील मैत्रीचा धागा अधिक घट्ट होत चालला असून, मैत्रीपेक्षाही या नात्यामध्ये भरपूर काही असल्याचे प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री दोघांचे एकत्र डिनरला जातानाचे फोटोही कॅमे-यांनी टिपले.