Join us

कॅट, अनुष्का यांच्यासह ‘बादशहा!’

By admin | Updated: September 12, 2015 04:04 IST

क तरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांना यश चोप्रा यांच्या ‘जब तक है जान’ चित्रपटात शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. मेकअप रूममधील या तिघांचाही

क तरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांना यश चोप्रा यांच्या ‘जब तक है जान’ चित्रपटात शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. मेकअप रूममधील या तिघांचाही एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅटने शाहरूखसोबत काम केले त्यावेळी तिला किंग खानसोबत काम करण्याची फारच भीती वाटत असायची. ती म्हणते की, ‘मी यापूर्वी कधीही एवढे त्याच्यासोबत काम केलेले नाही; पण या चित्रपटामुळे मला खूप काही शिकायला मिळाले. सुरुवातीला काम करण्यापूर्वी अनकम्फर्टेबलपणा असायचा. आता कम्फर्ट लेव्हल वाढली आहे. तसेच अनुष्काही म्हणाली, ‘रब ने बना दी जोडी’मध्ये मलाही शाहरूखसोबत काम करायला थोडी भीती वाटली. त्याने मला खूप कम्फर्टेबल केले. मी त्याच्याबद्दल खूपच गे्रटफुल आहे.’