Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 18:10 IST

चाहत्यांचे आभार मानत म्हणाली...

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहचा (Kashmera Shah) काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. ती कुटुंबासोबत लॉस एंजिलिस येथे गेली होती. सुट्टी एन्जॉय केल्यानंतर कृष्णा दोन्ही मुलांसह भारतात परतला. तर कश्मिरा मात्र तिकडेच थांबली होती. दरम्यान मॉलमध्ये फिरत असताना आरशाला धडकल्याने तिच्या चेहऱ्यावर काचा लागल्या. यात तिच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. अपघातनंतर कश्मिरा पहिल्यांदाच बाहेर पडली आहे. तिने व्हिडिओ शेअर करत हेल्थ अपडेट दिली आहे.

कश्मिरा शाह आता अपघातातून बरी होत आहे. काही दिवसांपूर्वी तिने नाकाला पट्टी असलेला फोटो शेअर केला होता. आता व्हिडिओ शेअर करत तिने आपली परिस्थिती दाखवली. मोठं बँडेज काढून आता छोटं ट्रान्सपरंट बँडेज लावलेलं आहे. ते दाखवत ती म्हणाली, "मोठं बँडेज निघालं. आता छोटंसं बँडेज आहे. थोडी खूण आहे. पण मला आता बरं वाटत आहे. तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी आभार. सगळ्यांना खूप प्रेम."

कश्मिरा शाहने अपघात झाल्यानंतर रक्ताने माखलेल्या टिश्यूंचा फोटो पोस्ट केला होता. ते पाहून सगळेच काळजीत पडले होते. मात्र आता ती त्यातून हळूहळू बरी होत आहे. कृष्णा तिला भेटण्यासाठी त्वरित निघणार होता मात्र तिनेच त्याला थांबवलं होतं. काही दिवसात कश्मिरा पुन्हा भारतात परतणार आहे.   

टॅग्स :सेलिब्रिटीअपघातसोशल मीडिया