Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kartik Aaryan: 'सत्यप्रेम की कथा' हिट होताच कार्तिक आर्यननं जूहूत विकत घेतलं आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 10:09 IST

अभिनेत्याने मुंबईत स्वत:च घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याचा सिनेमा 'सत्यप्रेम की कथा'मुळे खूप चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलं प्रदर्शन करत आहे. लोकांचं प्रेम कार्तिक आणि कियाराच्या या सिनेमाला मिळतं आहे. याच दरम्यान कार्तिकशी संबंधीत एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याने मुंबईत स्वत:च घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार कार्तिक आर्यनने जुहूमधील पॉश भागात १७ कोटी ५० लाखांना एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत 7.49 कोटी रुपये आहे, परंतु अभिनेत्याने ती 17.50 कोटी रुपयांच्या प्रीमियमवर खरेदी केली आहे. कार्तिकचे हे नवीन घर 1,593.61 स्क्वेअर फूट  आहे. हे परिसरातील सर्वात महागड्या प्रॉपर्टीपैंकी एक आहे.  

याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर कार्तिक आर्यन शाहिद कपूरच्या घराता भाड्याने राहत होता. शाहिदला कार्तिक प्रत्येक महिन्याला ७.५ लाख रुपये भाडं देतं होता. आता याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर शाहिदने आपलं स्वत:च घर खरेदी केलं आहे.  

जुन्या काळातील तसेच सध्याच्या पिढीतील बॉलिवूड सेलिब्रिटींची घर खरेदीसाठी जुहू ही पहिली पसंती आहे. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, जितेंद्र, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा, झायेद खान, फरदीन खान या कलाकारांची घरेही जुहू परिसरात आहेत. कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यानंतर हा अभिनेता कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

 

टॅग्स :कार्तिक आर्यन