Join us  

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 13: ‘भुल भुलैय्या 2’ सूसाट! 13 व्या दिवशी कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 1:13 PM

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 13: कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी स्टारर ‘भुल भुलैय्या 2’ हा सिनेमा सूसाट पळतोय. बॉक्स ऑफिसवरच्या या चित्रपटाच्या कमाईनं सगळ्यांनाच थक्क केलं आहे.

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Day 13:  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) व कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर ‘भुल भुलैय्या 2’ हा सिनेमा सूसाट पळतोय. बॉक्स ऑफिसवरच्या या चित्रपटाच्या कमाईनं सगळ्यांनाच थक्क केलं आहे. दहाच दिवसांत या सिनेमानं 100 कोटींचा आकडा पार केला होता. चालू आठवड्यातही सिनेमानं चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात शनिवारी ‘भुल भुलैय्या 2’नं 11.35 कोटींचा बिझनेस केला होता आणि रविवारी 12.77 कोटींची कमाई केली होती. 

काल बुधवारी 13 व्या दिवशी या चित्रपटाने 4.45 कोटींची कमाई केली. मंगळवारी 4.85 कोटी कमावले.  चित्रपटाची एकूण कमाई 137.54 कोटी  झाली आहे.  लवकरच हा सिनेमा 150 कोटींचा टप्पा गाठेल, असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत.   या चित्रपटाचा बजेट 80 कोटी रूपये होता. हा बजेट चित्रपटाने कधीच वसूल केला आहे. ‘भुल भुलैय्या 2’ हा 2007 मध्ये आलेल्या ‘भुल भुलैय्या’चा सीक्वल आहे. पहिल्या पार्टमध्ये अक्षय कुमार व विद्या बालन लीड रोलमध्ये होते.

हाऊसफुल 5 मध्येही झळकणार कार्तिक?‘भुल भुलैय्या 2’मधील कार्तिकचा जबरदस्त अभिनय पाहून सगळेच त्याच्यावर फिदा आहेत. निर्माता-दिग्दर्शकही त्याला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सुक आहेत. ‘भुल भुलैय्या 2’नंतर कार्तिक आर्यन ‘हाऊसफुल 5’मध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. शिवाय ‘भुल भुलैय्या 2’नंतर कार्तिकने त्याची फी डबल केल्याचंही म्हटलं जातंय. अर्थात या सगळ्या अफवा असल्याचं कार्तिकने स्पष्ट केलं आहे. ‘माझा पुढचा सिनेमा कोणता आहे, कोणी मला विचारेल का... बेसलेस,’असं त्याने म्हटले आहे. फी वाढवण्याबद्दलही त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. मी फी वाढवलेली नाही. लाईफमध्ये फक्त प्रमोशन झालंय, इंन्क्रीमेंट नाही, असं त्याने म्हटलं आहे.

टॅग्स :भूल भुलैय्याकार्तिक आर्यनकियारा अडवाणीबॉलिवूडसिनेमा