Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘कार्टी’ परदेशातही हाऊसफुल

By admin | Updated: September 11, 2016 02:49 IST

तेजश्री प्रधान आणि प्रशांत दामले यांचे ‘कार्टी काळजात घसुली’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

तेजश्री प्रधान आणि प्रशांत दामले यांचे ‘कार्टी काळजात घसुली’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. भारतात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर सध्या या नाटकाचे प्रयोग लॉस एंजिलिसमध्ये सुरू आहेत. या नाटकाला तेथील प्रेक्षकदेखील डोक्यावर घेत आहेत. या नाटकाचा शो तिकिटबारीवरदेखील हाऊसफुल्ल झाला. याचा आनंद व्यक्त करताना तेजश्री आणि प्रशांत दामले यांनी हातात हाऊसफुल्लचा बोर्ड घेऊन एक फोटो काढला आहे आणि तो ट्विटरवर अपलोड केला आहे. हा प्रयोग लॉस एंजिलिसमधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नाटकाच्या प्रयोगातून वेळ काढून तेजश्रीने लॉस एंजिलिस फिरण्याचा आनंददेखील लुटला. तिने तेथील अनेक ठिकाणांवरील अतिशय सुंदर फोटो तिच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर केले आहेत.