Join us  

Karisma Kapoor: घटस्फोट, हिंसाचाराच्या आरोपांनंतर पहिल्या पतीसोबत दिसली करिश्मा कपूर, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 12:57 PM

काल रात्री मुंबईत एका पार्टीत करिष्मा कपूर आपल्या एक्स पतीसोबत दिसली.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. प्रोफेशनल आयुष्यात तिने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले मात्र खाजगी आयुष्यात तिला दु:ख सोसावं लागलं. यशाच्या शिखरावर असतानाच करिश्माचं उद्योगपती संजय कपूरसोबत (Sanjay Kapoor) लग्न झालं. मात्र काही वर्षांनी करिश्मा संजय आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला आणि तिने घटस्फोट घेतला. आता इतक्या वर्षांनंतर करिश्मा आणि एक्स पती संजय कपूर एका पार्टीत एकत्र दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

काल रात्री मुंबईत एका पार्टीत करिश्मा कपूर आपल्या एक्स पतीसोबत दिसली. यावेळी दोघांनी कॅमेऱ्यासमोर हसत हसत पोज दिली. दोघंही एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा हा व्हिडिओ आहे. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. मुलांसाठी ते एकत्र आल्याची चर्चा आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.

करिश्माचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र टीका करायला सुरुवात केली. 'चांगला ट्रेंड आहे लग्न करायचं मग घटस्फोट घ्यायचा आणि नंतर मुलांसाठी मित्र बनून राहायचं' अशी खोचक कमेंट एकाने केली आहे. तर काही जणांनी करिश्माच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. 'याही वयात ती खूपच सुंदर दिसत आहे तिला कोणी चांगला जोडीदार मिळाला असता' अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

करिश्मा कपूरचा खरंतर अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा झाला होता. मात्र काही कारणाने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. यानंतर करिश्माच्या आईने तिचं लग्न उद्योगपती संजय कपूरसोबत लावलं. २००३ मध्ये त्यांचं थाटात लग्न झालं. पण लग्नानंतर ७ वर्षातच २०१० मध्ये करिश्मा कायमची माहेरी आली.दोघांच्या घटस्फोटाची केस चांगलीच चर्चेत होती. करिश्माने संजय आणि कुटुंबियांवर हिंसाचार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :करिश्मा कपूरसंजय कपूरपती- जोडीदारघटस्फोटबॉलिवूड