Join us
Daily Top 2Weekly Top 5

करणच आहे ‘करेला किंग’

By admin | Updated: September 26, 2016 01:42 IST

‘जिंदगी की महक’ या मालिकेत महकला जेवण बनवायला खूप आवडते. ती नेहमीच वेगवेगळे पदार्थ करून आपल्या कुटुंबीयांना खूश ठेवत असते

‘जिंदगी की महक’ या मालिकेत महकला जेवण बनवायला खूप आवडते. ती नेहमीच वेगवेगळे पदार्थ करून आपल्या कुटुंबीयांना खूश ठेवत असते असे दाखवण्यात आले आहे. महक सोशल मीडियावर ‘करेला किंग म्हणजे केके’ नावाच्या व्यक्तीशी नेहमी संपर्कात असते. हा केके म्हणजेच या मालिकेचा नायक दाखवला जाणार आहे. ही भूमिका करण वोहरा हा अभिनता साकारणार आहे. करण २००८ मिस्टर इंडिया वर्ल्ड कॉन्टेस्टमध्ये टॉप फायनलिस्ट होता. केकेचे खरे नाव शौर्य असले, तरी तो सोशल मीडियावर एका टोपण नावाने ब्लॉग लिहितो. करण त्याच्या या भूमिकेच्या प्रेमात पडला आहे. ही भूमिका साकारताना खूप मजा येतेय, असे तो सांगतो.