Join us

करीना कपूर, सैफच्या मुलाचं पूर्ण नाव काय, परीक्षेत विचारला प्रश्न; पालकांनी केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 12:38 IST

इयत्ता सहावीच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला होता प्रश्न.

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. चित्रपट कलाकार असोत किंवा त्यांची मुलं, कोणत्या ना कोणत्या कारणानं ते चर्चेचा विषय ठरतच असतात. लहान मुलं असोत मोठ्या व्यक्ती अनेकांना बॉलिवूडची प्रचंड क्रेझ आहे. परंतु आता एक असा प्रकार समोर आला आहे, ज्यावरुन मुलं आणि त्यांचे पालकही हैराण झाले आहेत. मध्यप्रदेशातील खंडावा येथील एका शाळेत सामान्य ज्ञानाच्या परीक्षेत करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव विचारण्यात आले होते. हा प्रश्न पाहून सहावीचे विद्यार्थीही हैराण झाले.

सहावीच्या या प्रश्नपत्रिकेत बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या मुलाचे नाव विचारण्यात आल्यानं आता प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, हा प्रश्न पाहून मुलांचे पालक आणि पालक शिक्षक संघटनेनं शिक्षण विभागाकडे तक्रारही केली आहे. हा प्रश्‍न भावना दुखावणारा आहे, असं त्यांचं मत आहे. एवढंच नाही तर जिल्हा शिक्षक अधिकाऱ्यांनी या प्रश्नाबाबत नोटीसही बजावली आहे.  "शाळेला जर काही प्रश्न विचारायचा असता तर देशातील महापुरुषांबद्दल किंवा देशभक्तांबाबत प्रश्न विचारला असता. परंतु आता विद्यार्थ्यांनी फिल्मस्टार्सच्या मुलांची नावही लक्षात ठेवायची का?," असा प्रश्न डॉ. अनिश आरझारे केला.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुर