Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तैमूर' नावाचं सैफच्या बालपणीशी आहे कनेक्शन, करीनाने पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 09:27 IST

तैमूर या नावावरुन लोकांनी नाराज होण्याचं काय कारण होतं हे मला आजपर्यंत समजलं नसल्याचं करिना म्हणाली.

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान (Kareena Kapoor)आगामी 'जाने जान' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून करिना ओटीटीवर पदार्पण करत आहे. मर्डर मिस्ट्री असलेल्या या सिनेमात करिना कपूरसह विजय वर्मा आणि जयदीप पहलावत मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने करिनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिने पहिल्यांदाच 'तैमूर' (Taimur) या  नावावरुन झालेल्या टीकेवर उत्तर दिलं. 

सैफ अली खानच्या बालपणीशी आहे कनेक्शन

प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. तैमूर या नावावरुन लोकांनी नाराज होण्याचं काय कारण होतं हे मला आजपर्यंत समजलं नसल्याचं करिना म्हणाली. एक्सप्रेस अड्डाच्या मुलाखतीत करिना म्हणाली,'जेव्हा आम्ही नावाचा विचार करत होतो तेव्हा सैफ म्हणाला की त्याच्या शेजारी एक मित्र राहायचा जो त्याचा बेस्ट फ्रेंड होता. तो त्याचा पहिला मित्र होता. त्याचं नाव सैफला खूप आवडायचं. त्यामुळे सैफने ठरवलं होतं की जर त्याला मुलगा झाला तर तो त्याचा मित्रच असेल. तो त्याचं नाव तैमूर ठेवेल असं त्याने ठरवलं होतं. याच कारणाने आम्ही आमच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं.'

ती पुढे म्हणाली, 'कोणाही मुलावर किंवा त्याच्या आईवर अशी परिस्थिती येऊ नये असं मला वाटतं. लोकांनी मला एवढं का टार्गेट केलं हे माझ्यासाठी आजही एक कोडच आहे. मी तर कोणाचं नुकसान केलं नव्हतं. आम्हालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जे करायचंय ते करण्याचा हक्क आहे. मला आणि सैफला तरी असंच वाटतं.'

16 डिसेंबर 2016 रोजी करिनाने तैमूरला जन्म दिला. मुस्लिम लुटेऱ्याच्या नावारुन मुलाचं नाव ठेवल्याने करिना आणि सैफ चांगलेच ट्रोल झाले होते. संपूर्ण समाज करिनाच्या विरोधात गेला होता. 'हिंदू नाव मिळालं नाही का' असं म्हणत तिला धारेवर धरले गेले होते. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच करिनाने या वादावर भाष्य केलं आहे.

टॅग्स :करिना कपूरतैमुरसैफ अली खान