अ भिनेता अर्जुन कपूरला वाटते की, करिना कपूर खान ही अतिशय साधी व्यक्ती असून ती बॉलीवूडची सेलिब्रिटी म्हणून वागतच नाही. बालपणीपासून जिच्यावर क्र श आहे अशी करिनासोबत काम करणे थोडे सोपेच जात आहे असे ‘की अॅण्ड का’ चित्रपटाचा अभिनेता अर्जुन कपूर म्हणाला. तो म्हणतो,‘ तिच्याकडून शिकलेली महत्त्वाची बाब म्हणजे ती खुपच साधी आहे. सेटवर असली काय किंवा घरी असली काय ती एकच असते. ती तिला मिळालेली प्रसिद्धी किंवा नाव यामुळे ती फार गर्विष्ठ नाही. मला वाटतं की, हीच तिची खरी पावती आहे. ती तिच्या दिग्दर्शकांचे खुपच शांतपणे ऐकून घेते. खुप लोक असे आहेत की ज्यांना स्वत:ची मते आणि दृष्टिकोन असतात. पण करिना तसे करत नाही.
‘करिनाचे कौतुक वाटते’
By admin | Updated: November 1, 2015 02:05 IST