Join us  

मनोज जोशीकडून करणवीर शर्मा घेतो सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 4:36 PM

करणवीर शर्मा सोनी सबवर लवकरच सुरू होणाऱ्या 'मंगलम दंगलम - कभी प्यार कभी वार' या मालिकेत अभिनेता मनोज जोशीसोबत दिसणार आहे.

ठळक मुद्देकरणवीर शर्मा अर्जून कुट्टीच्या भूमिकेत

करणवीर शर्मा सोनी सबवर लवकरच सुरू होणाऱ्या 'मंगलम दंगलम - कभी प्यार कभी वार' या मालिकेत अभिनेता मनोज जोशीसोबत दिसणार आहे. त्यांच्यासोबत ऑफस्क्रीन नात्याबद्दल करणवीरने सांगितले. ते मला माझ्या वडिलांसारखेच वाटतात. चित्रीकरणात सतत मी त्यांच्याकडून सल्ले, मार्गदर्शन घेत असल्याचे करणवीर म्हणाला.

या मालिकेत करणवीर शर्मा एका तरुण, भावी जावयाची भूमिका करणार आहे. आपल्या भावी सासऱ्यांना (मनोज जोशी) खुश करण्यासाठी, त्यांच्या मुलीसाठी आपणच योग्य वर आहोत, हे पटवून देण्यासाठी तो शक्य ते सगळे प्रयत्न करणार आहे. भावी जावई आणि त्याचे सासरे यांच्यातील नातेसंबंधांचे विविध पैलू काहीशा विनोदी अंगाने या मालिकेत मांडण्यात आले आहेत.मनोज जोशी यांच्यासोबत पडद्यामागे कसे संबंध आहेत हे विचारल्यावर करणवीर म्हणाला, मी या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात केली तेव्हा कुणालाच ओळखत नव्हतो. मनोज जोशी यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला ते फारच गंभीर वृत्तीचे वाटले होते. ते माझ्या सासऱ्यांची भूमिका करताहेत. त्यामुळे मी त्यांच्यासोबत फार खेळीमेळीने राहू नये, असे त्यांना वाटत असणार. मात्र, आता आम्ही थोडे मोकळे झालो. ते मला माझ्या वडिलांप्रमाणेच वाटतात. चित्रीकरणात सतत मी त्यांच्याकडून सल्ले, मार्गदर्शन घेत असतो. मनोज जोशी मनाने फारच तरुण आहेत.करणवीरने साकारलेली अर्जून कुट्टी हा दाक्षिणात्य तरुण तत्वांना मानणारा, आधुनिक विचारसरणीचा मुलगा आहे. स्टीरीओटाइप गोष्टींवर त्याचा विश्वास नाही. मर्म विनोदबुद्धी आणि बुद्धिमत्तेने तो सर्वांचे मन जिंकून घेतो. तो एक उत्तम बॉय नेक्स्ट डोअर आहे. आता ही मालिका रसिकांना कितपत भावते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :मंगलम दंगलममनोज जोशी