Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक अनोखा योगायोग! करण सिंह ग्रोवरने सांगितलं लेकीचं नाव 'देवी' ठेवण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 14:26 IST

बिपाशा आणि करणच्या लेकीच्या नावाचं वैष्णोदेवी मातेशी आहे कनेक्शन

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूच्या (Bipasha Basu) लेकीचं नाव 'देवी' आहे. बिपाशा आणि पती करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) नेहमीच लाडक्या देवीसोबत फोटो शेअर करत असतात. देवी जशीजशी मोठी होत आहे तिच्या बाललीला पाहायला मिळत आहेत. चाहतेही 'देवी'ची झलक पाहताच खूश होत आहेत. तुम्हाला माहितीये का बिपाशा करणने लेकीचं नाव देवी ठेवलं कारण या नावाचं वैष्णोदेवी मातेशी कनेक्शन आहे.

नुकतंच अभिनेता करण सिंह ग्रोवरने एका मुलाखतीत लेकीचं नाव 'देवी' ठेवण्यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला, "मी आणि बिपाशा एका ज्योतिषाला भेटलो होतो. जी आमची मैत्रीणही आहे. तिने आम्हाला विचारलं की कधी वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेला आहात का? यावर मी म्हणालो की नाही. तेव्हा ती म्हणाली की तुम्ही तिथे गेलं पाहिजे. तसंच तुमची इच्छा सांगत एक पत्रही लिहिलं पाहिजे. दैवी शक्तीने तुम्हाला जो आशीर्वाद दिला आहे त्यासाठी तुम्ही आभारी आहात."

तो पुढे म्हणाला,"आम्ही दोघं 23 नोव्हेंबर 2021 रोजी वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथून परत आलो आणि बिपाशा गरोदर राहिली. आधी तिची ड्यू डेट २३ नोव्हेंबर 2022 देण्यात आली होती. या जादुई योगायोगामुळेच आम्ही मुलीचं नाव 'देवी' ठेवलं. 

करण ग्रोवर आणि बिपाशा 2016 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. बिपाशाने लग्नानंतर 6 वर्षांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी देवीचा जन्म झाला. बिपाशाची प्री मॅच्युर डिलीव्हरी झाली होती. देवीच्या जन्मानंतर तिच्या हृदयात छिद्र होते. तिच्यावर सर्जरी करण्यात आली होती.

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हरबॉलिवूडपरिवार