Join us

करण जोहर म्हणाला ‘पार्टनर’ हवा, युजर्स म्हणाले, कंगना है ना...!!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 17:20 IST

बॉलिवूड सेलिब्रिटी आपआपल्या अंदाजात व्हॅलेन्टाईन डे साजरा करत आहेत. पण सर्वाधिक चर्चा आहे ती, करण जोहरने केलेल्या ट्वीटची.

ठळक मुद्दे‘मी गेल्या ४६ वर्षांपासून प्रेम शोधतोय. आता प्रेम देण्याची वेळ आलीय. त्याला मला शोधावेच लागेल... ,’ असे करणने लिहिले.

बॉलिवूड सेलिब्रिटी आपआपल्या अंदाजात व्हॅलेन्टाईन डे साजरा करत आहेत. पण सर्वाधिक चर्चा आहे ती, करण जोहरने केलेल्या ट्वीटची. होय, आज व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर करणने एक ट्वीट केले आणि त्याच्या या ट्वीटने नेटक-यांचे लक्ष वेधले. ‘मी गेल्या ४६ वर्षांपासून प्रेम शोधतोय. आता प्रेम देण्याची वेळ आलीय. त्याला मला शोधावेच लागेल... ,’ असे करणने लिहिले.

करणच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्यात. पण काही नेटक-यांनी मात्र यावरून करणची चांगलीच मजा घेतली. एका युजरने तर करणची मजा घेत, त्याला चक्क कंगना राणौतचे नाव सुचवले. आता करण व कंगनातील वाद तुम्हाला ठाऊक आहेच. पण याऊपरही करण, तुझ्यासाठी कंगना बेस्ट राहिल, असे एका युजरने लिहिले. अन्य युजर्सनीही करणची फिरकी घेतली.दरवर्षी व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी करण जोहर बॉलिवूडमध्ये सिंगल स्टेट्स असलेल्या सेलिब्रिटींसाठी पार्टी देतो. अर्थात यंदा करणने हा बेत रद्द केला. आता का, तर याचे उत्तर त्याच्या वर केलेल्या टिष्ट्वटमध्येच दडलेले आहे. करणला स्वत: ‘सिंगल’ चे ‘मिंगल’ व्हायचे वेध लागले आहेत. अशात सिंगल स्टेट्स असलेल्यांसाठी तो का पार्टी देईल?काल-परवा कमाल आर खान याने करणला त्याचा व्हॅलेन्टाईन डे पार्टनर होण्याची आॅफर दिली होती. ‘डियर करण जोहर, व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी माझ्याकडे एकही गर्लफ्रेन्ड नाही. काय तू माझा व्हॅलेन्टाईन डे पार्टनर बनशील?’ असा खोचक प्रश्न कमाल आर खानने विचारला होता. त्याच्या या खोचक प्रश्नावरही नेटक-यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या होत्या.

 

टॅग्स :करण जोहरकंगना राणौत