Join us

'अग्निपथ' फ्लॉप झाल्यानंतर अशी झाली होती यश जोहर यांची अवस्था, करण जोहरने स्वत: सांगितली होती परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 18:38 IST

करण जोहरने अनेक वर्षांनी याबाबतचा खुलासा केला होता. वडिलांची अवस्था सांगताना करण भावूक झाला होता.

1990 साली प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा 'अग्निपथ' हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील महत्त्वाच्या सिनेमांपैकी एक असेल, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल चंद यांनी केले होते आणि यश जोहर यांनी निर्मिती केली होती. अमिताभ यांचा 'अग्निपथ' यश जोहर यांच्या अगदी जवळ होता, त्यामुळे जेव्हा हा चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा यश जोहरलुद्धा तुटले होते. 

करण जोहरने  अनेक वर्षांनी याबाबतचा खुलासा केला होता. तो काळ आठवून करण जोहर भावूक होत म्हणाला होता, 'अग्निपथ' फ्लॉप झाल्यानंतर 'वडीलचं मनं नाराज झालं होतं. त्यानंतर करण जोहरने २०१२ मध्ये पुन्हा अग्निपथ बनवला जो हिट ठरला. कलर्सवरील रिअॅलिटी  हुनरबाजमध्ये करणने हा खुलासा केला होता. 

या शोदरम्यान एका लहान मुलाने नव्या 'अग्निपथ' मधील 'अभी मुझे मैं कहें' या प्रसिद्ध गाण्यावर बासरी वाजवली होती. हे गाणं ऐकून करणला रडू आलं होते आणि तो म्हणला होता, 'हे गाणं ऐकून मी भावूक झालो...हा चित्रपट पापांच्या हृदयाच्या खूप जवळ होता, त्यामुळे जेव्हा हा सिनेमा फ्लॉप झाला तेव्हा ते नाराज झाले होते.  त्यानंतर आम्ही हा चित्रपट पुन्हा केला.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करण जोहर 'धडक २' घेऊन येणार आहे. यासाठी अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांना साईन करण्यात आलंय. करण जोहर बॅनरखाली बनवण्यात येणारा या सिनेमाचं शाजिया इकबाल दिग्दर्शन करणार आहेत. ही त्यांची पहिलीच बॉलिवूड फिल्म असेल. 

टॅग्स :करण जोहरयश जोहर