Join us

करण जोहर 50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन - रणबीर कपूर

By admin | Updated: October 14, 2016 15:05 IST

करण जोहर हा 50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन आहे, आणि करणचीच भूमिका मी सिनेमामध्ये साकारत आहे, असा रणबीर म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.14 - बॉलिवूडमधील रोमान्सचा हिरो रणबीर कपूर आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत, ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. या दोघांनी अनेकदा एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, अखेर 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.  रोमॅन्टिक, क्लासिक म्यु्झिक-गाणी, ड्रामा, इमोशन्सचा मसाला असलेल्या या सिनेमाचे शुटिंग करताना या दोघांनी मज्जा-मस्तीही तितकीच केली आहे. या सिनेमामध्ये अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय-बच्चन यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
आणखी बातम्या
 
दरम्यान, 'ए दिल है मुश्किल हा सिनेमा करण जोहरच्या आयुष्यावर आधारित असून, करण जोहर हा 50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन आहे, आणि त्याचीच भूमिका मी सिनेमामध्ये साकारत आहे', असे रणबीरने म्हटले आहे. खरंतर रणबीरने हे सर्व गंमतीत म्हटले आहे. करणने देखील रणबीरचे हे बोलणे मस्करीत घेतले, मात्र 'मी 50 नाहीतर 44 वर्षाचा आहे', असे सांगत त्याने रणबीरची चूक सुधारली. 'द ब्रेकअप साँग' या गाण्याच्या शुटिंगवेळी एकमेकांची मस्करी करत असतानाचा या दोघांचा व्हिडीओ एका टीव्ही चॅनेलने प्रसारित केला आहे. ज्यात रणबीरने करणला '50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन' असे म्हटले आहे.