Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपूर कुटुंबीयांना बाळाची चाहूल!

By admin | Updated: April 10, 2016 01:39 IST

सध्या शाहीद आणि मीराच्या आयुष्यात ‘मौजा ही मौजा’ म्हणावं, अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी मिळालेली अफवा ही अफवा नसून खरी बातमी असल्याचे उघडकीस आले आहे.

सध्या शाहीद आणि मीराच्या आयुष्यात ‘मौजा ही मौजा’ म्हणावं, अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी मिळालेली अफवा ही अफवा नसून खरी बातमी असल्याचे उघडकीस आले आहे. मीरा राजपूत कपूर ही प्रेग्नंट असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. आणि हो.... सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीरा दोन महिन्यांनी गरोदर आहे. ही बातमी शाहीद कपूरची जवळची मैत्रीण मसाबा गुप्ता हिने इन्स्टाग्रामवर फोटोसह अपलोड केली आहे. शाहीद आणि मीरा हे जुलै ७ ला छत्तरपूर येथील बंगल्यात विवाहबद्ध झाले. सिखसोबत असलेला हा आनंद कारज सोहळा होता. मधू आणि मसाबा हे दोघे त्या विशिष्ट पाहुण्यांपैकी एक होते. वेल, एकंदरीत काय तर शाहीद-मीरा यांच्या आयुष्यात आता सगळं आलबेल आणि मौजा ही मौजाच असणार आहे.