बॉलीवूडची नवोदित अभिनेत्री सिमरन कौर आता कॉमेडी किंग कपिल शर्मासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अब्बास मस्तान यांच्या कॉमेडी चित्रपटात कपिल काम करीत आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शक अशा अभिनेत्रीच्या शोधात होते, जी दिसायला ग्लॅमरस असेलच शिवाय तिला पंजाबी चित्रपटांची माहितीही असावी. दिग्दर्शकांचा शोध तेव्हा संपला जेव्हा त्यांची भेट मॉडेल सिमरन कौरशी झाली. माजी मिस इंडिया सिमरनने एक तेलगू आणि दोन पंजाबी चित्रपटांसह कुक्कू माथूर की झंड हो गई या चित्रपटात अभिनय केला आहे. कपिलचा हा पहिलाच चित्रपट असला, तरी सिमरनला मात्र यापूर्वी एका हिंदी चित्रपटाचा अनुभव आहे. या आधी चित्रपटाची हिरोईन म्हणून एली अवरामच्या नावाची चर्चा होती; पण आता सिमरनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.