Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्माला दिलासा, हा फेमस चेहरा शोमध्ये परतणार

By admin | Updated: April 14, 2017 21:05 IST

लोकप्रियतेच्या यादीत अग्रस्थानी असेल्या द कपिल शर्मा शोला सुनिल ग्रोव्हरच्या एक्झिटपासून उतरती कळा लागली होती

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - लोकप्रियतेच्या यादीत अग्रस्थानी असेल्या द कपिल शर्मा शोला सुनिल ग्रोव्हरच्या एक्झिटपासून उतरती कळा लागली आहे.  सुनिलची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक कलाकारांना शोमध्ये आणलं गेलं पण काही उपयोग झाला नाही.  मात्र, आता कपिलसाठी दिलासादायक बातमी आली आहे. शोमध्ये एका जुन्या पात्राचं पुनरागमन होणार आहे. या कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकार उपासना सिंग म्हणजे प्रेक्षकांची लाडकी (बुवा) कपिलच्या शोमध्ये परतणार आहे.  
 
उपासना कल्रर्स टीव्हीवर येणा-या कॉमेडी नाइट्स विद कपिलमध्ये कपिलच्या बुवाचं पात्र साकारत होती. मात्र, नव्या द कपिल शर्मा शोचा ती जास्त दिवस हिस्सा नव्हती. आता ती बुआच्या भूमिकेत नाही तर वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. 
 
‘द कपिल शर्मा शो’बद्दल उपासना म्हणाली की, ‘यावेळी मी एका बुवाच्या नव्हे, तर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिलसोबतच्या  कार्यक्रमातील सहभागाबद्दल  मला अनेकदा विचारण्यात आले.’  प्रेक्षकांची उत्सुकता पाहून मी पुन्हा कपिलसोबत काम करण्यास सज्ज झाल्याचे उपासनाने सांगितले.
 
सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी कपिलसोबत झालेल्या वादानंतर द कपिल शर्मा शो सोडला आहे. त्यामुळे शूटींगच्या वेळी आपल्या या सहकलाकारांची नक्कीच आठवण येईल, असेही उपासना म्हणाली.