Join us
Daily Top 2Weekly Top 5

द कपिल शर्मा शो फेम चंदन प्रभाकरची पत्नी आहे खूपच सुंदर, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:55 IST

चंदन त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो सोशल  मीडियावर पोस्ट करत असतो. या फोटोत आपल्याला त्याची पत्नी देखील पाहायला मिळते.

ठळक मुद्देचंदन प्रभाकरची ची पत्नी दिसायला खूपच सुंदर असून त्यांची जोडी चंदनच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच भावतात. या कार्यक्रमात चंदन प्रभाकर आपल्याला चंदू चायवाला या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. केवळ प्रेक्षकच नव्हे तर सेलिब्रेटींमध्ये देखील हा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. चंदनला या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली असून सोशल मीडियावर देखील त्याचे चाहते त्याला मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. चंदन देखील त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे, त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो सोशल  मीडियावर पोस्ट करत असतो. या फोटोत आपल्याला त्याची पत्नी देखील पाहायला मिळते. त्याची पत्नी दिसायला खूपच सुंदर असून त्यांची जोडी चंदनच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. 

द कपिल शर्मा शोचा सर्वेसर्वा कपिल शर्मा आणि चंदन प्रभाकर हे लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. चंदनने द कपिल शर्मा शोच्या आधी कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात देखील कपिलसोबत काम केले होते. तसेच त्याने काही पंजाबी चित्रपटात देखील काम केले आहे. भावनाओ को समझो या हिंदी चित्रपटात देखील तो झळकला होता. पण त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमानेच दिली. 

चंदन आणि कपिल यांच्या मैत्रीचे अनेक किस्से त्यांनी मुलाखतीत सांगितले आहेत. त्या दोघांनीही अभिनयक्षेत्रात येण्यासाठी एकत्र स्ट्रगल केला आहे. पण आज दोघांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर टिव्ही इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :द कपिल शर्मा शोचंदन प्रभाकर