Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्मा सेटवर पडला बेशुद्ध, शाहरुख शुटिंग न करताच परतला माघारी

By admin | Updated: July 8, 2017 18:27 IST

कॉमेडीयन कपिल शर्मा शुटिंग सुरु होण्याआधीच बेशुद्ध पडला असल्या कारणाने रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - कॉमेडीयन कपिल शर्मा शुटिंग सुरु होण्याआधीच बेशुद्ध पडला असल्या कारणाने रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. कपिल शर्मा बेशुद्द पडल्याने बॉलिवूड बादशहा शाहरुख खानला शुटिंग न करताच माघारी परतावं लागलं. शाहरुख खान आपला आगामी चित्रपट "जब हॅरी मेट सेजल"च्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी शाहरुख खानसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अलीदेखील उपस्थित होते. 
 
शुटिंगची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. स्टेजदेखील तयार झाला होता.  "जब हॅरी मेट सेजल" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान आणि इम्तियाज अलीदेखील शुटिंगसाठी वेळेत पोहोचले होते. मात्र कपिल शर्माची तब्बेत अचानक खराब झाल्याने ऐनवेळी शुटिंग रद्द करावी लागली. 
आणखी वाचा 
कॉमेडियन कपिल शर्मा रुग्णालयात दाखल
कपिल शर्माची चहुबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात, कृष्णा-सुनिल येणार एकत्र
"द कपिल शर्मा शो"मुळे नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत
 
गेल्या अनेक दिवसांपासून कपिल शर्माची प्रकृती खराब आहे. शुक्रवारी कपिल शर्मा बॅकस्टेजला असतानाच भोवळ आल्याने बेशुद्ध पडला. यामुळे शुटिंग रद्द करावं लागलं. यानंतर शाहरुख खानही एपिसोड शूट न करता परत निघून गेला. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "एपिसोडच्या शुटिंगसाठी शाहरुख पुर्णपणे तयार होता. मात्र कपिल शर्मा शुटिंग करण्याच्या परिस्थितीत नव्हता. स्टेजवर येण्याआधीच कपिल शर्मा बेशुद्द पडला. जेव्हा कपिल शर्मा स्क्रिप्ट वाचत होता, तेव्हाच त्याला तब्बेत व्यवस्थित नसल्याचं जाणवत होतं. यानंतर तो बेशुद्दच पडला. उपस्थित कलाकारांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेऊन दाखल केलं. या एपिसोडचं शुटिंग पुढील काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे". 
 
काही दिवसांपुर्वीदेखील कपिल शर्माला रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. जून महिन्याच्या सुरुवातीलाच कॉमेडियन कपिल शर्माला अस्वस्थ वाटू लागल्यानं खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार कपिलला रक्तदाब वाढल्याने लागल्यानं अस्वस्थ वाटू लागलं होतं. यामुळे त्याला तातडीनं अंधेरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.    
 
""द कपिल शर्मा शो"" या कार्यक्रमाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल आपल्या कार्यक्रमाच्या एपिसोडचे शुटिंग बुधवारी करणार होता. अभिनेता परेश रावल या एपिसोडचे पाहुणे होते. परेश रावल आपला आगामी सिनेमा ""वेलकम टु लंडन""चे प्रमोशन करण्यासाठी ""द कपिल शर्मा शो""मध्ये येणार होते. सेटवर पोहोचताच कपिल शर्मानं क्रू मेंबर्सना त्याला बरे वाटत नसल्याचे सांगितले होते. यामुळे कार्यक्रमाचे शुटिंग थांबवण्यात आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कपिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
 
हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी कपिलला अॅडमिट होण्यास सांगितले होते. कपिलला रक्तदाब वाढल्यामुळे त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले  होते.