Join us

कबीर खानच्या '८३' सिनेमाच्या शूटिंग आधी रणवीर सिंग होणार गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 15:38 IST

सध्या रणवीर सिंग आपला आगामी सिनेमा गली बॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर कबीर खानच्या '८३'  सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

ठळक मुद्दे'८३'  सिनेमासाठी तो सध्या मैदानावर घाम गाळतोयलवकरच रणवीर सिंग '८३'च्या पहिल्या शेड्यूलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे

सध्या रणवीर सिंग आपला आगामी सिनेमा गली बॉयच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर कबीर खानच्या '८३'  सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. '८३'  सिनेमासाठी तो सध्या मैदानावर घाम गाळतोय. या सिनेमा संबंधीत एक माहितीसमोर येतेयं. 

लवकरच रणवीर सिंग '८३'च्या पहिल्या शेड्यूलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सिनेमाची संपूर्ण कास्ट तयारीला लागली आहे. यासाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये होणारे हे बूट कॅम्प जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या कॅम्पमध्ये क्रिकेटर्स सिनेमातील कलाकारांना क्रिकेट शिकवणार आहे. रणवीर सिंगसोबत या कॅम्पमध्ये  जीवा, एमी विर्क, साहिल खट्टर आणि सैय्यद किरमानीसुद्धा क्रिकेटचे धडे गिरवणार आहेत.   

१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला; तो क्षण आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात जिवंत आहे.लवकरच रणवीर या सिनेमासाठी कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.  हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :८३ सिनेमारणवीर सिंगकपिल देव