Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना म्हणतेय...आता डेट नाही थेट लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 14:38 IST

आपल्या खासगी आयुष्यात अनेक चढ उतार अनुभवलेल्या बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना राणौतच्या आयुष्यात कोणीतरी खास आले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - आपल्या खासगी आयुष्यात अनेक चढ उतार अनुभवलेल्या बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना राणौतच्या आयुष्यात कोणीतरी खास आले आहे. त्या खास व्यक्तीसोबत डेटींग नाही तर थेट बोहल्यावर चढण्याची तिची इच्छा तिने व्यक्त केली. चित्रपट समिक्षक अनुपमा चोप्राच्या कार्यक्रमात आपल्या आगामी रंगून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली असता ती लग्नाविषयी आपले मत सांगितले. ती म्हणाली आता कोणाबरोबर डेटींग नाही तर त्या व्यक्तीबरोबर लग्नच करायचं आहे. यावेळी तीने त्या व्यक्तीचे नाव जाहिर केले नाही. पण त्या व्यक्तीबद्दल मनमोकळ्यापणे गप्पा मारल्या. या मुलाखतीत बोलताना कंगना म्हणाली, तुमचे वय जेव्हा २० वर्षाहून अधिक असते तेव्हा लोक लग्न का करत असतील असे वाटायला लागते. पण वय वाढत तिशीकडे झुकते तेव्हा तुमच्यात मातृत्वाची भावना उफाळून येते आणि या गोष्टीकडे आपण वेगळ्या नजरेतून पाहू लागतो. मी लग्नसंबंधाला माझे सर्वश्रेष्ठ योगदान द्यायला तयार आहे पण समोरच्या व्यक्तीचे वागणेदेखील असेच असायला हवे. मला कोणी भेटले आहे ज्याच्यावर अंतकरणापासून मी प्रेम करीत आहे. पण मी फक्त डेटींग नाही तर त्याच्यासोबत लग्न करु इच्छिते. कंगना सध्या तीच्या आगामी रंगून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यापुर्वी कंगनाचे नाव आदित्य पांचोली, अध्ययन सुमन आणि हृतिक रोशन सोबत जोडले गेले होते. तिचे एका ब्रिटीश व्यक्तीसोबत संबंध असल्याचेही मध्यंतरी वृत्त होते. सध्य कंगनाच्या आयुष्यत कोण आहे हे तिने अद्याप स्पष्ट केले नाही.