Join us

कंगना संतापली

By admin | Updated: March 11, 2017 02:50 IST

बॉलिवूडमध्ये इतका छळ होत असेल तर कंगनाने ही इंडस्ट्री सोडावी, हे दिग्दर्शक करण जोहरचे शब्द अभिनेत्री कंगना रणौतने करणच्याच घशात घातले आहेत. होय, करण

बॉलिवूडमध्ये इतका छळ होत असेल तर कंगनाने ही इंडस्ट्री सोडावी, हे दिग्दर्शक करण जोहरचे शब्द अभिनेत्री कंगना रणौतने करणच्याच घशात घातले आहेत. होय, करण आणि कंगना यांच्यातील शाब्दिक युद्ध आता वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. आधी ‘कॉफी विद करण’मध्ये कंगनाने करणला डिवचले. करणला ‘फिल्मी माफिया’ म्हणण्यापर्यंत कंगना गेली. यानंतर करणनेही कंगनाचा खरपूस समाचार घेतला. कंगनाला इतकाच त्रास होत असेल तर तिने बॉलिवूड सोडावे, असा थेट सल्ला देऊन तो मोकळा झाला. पण आता हा सल्ला देणारा करण कोण? असा प्रश्न आम्ही नाही तर कंगनाने उपस्थित केला आहे. मला इंडस्ट्री सोडायला सांगण्याचा करणला काहीही अधिकार नाही. ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या २० वर्षी भेट दिलेला एखादा स्टुडिओ नाहीयं. ही इंडस्ट्री प्रत्येक भारतीयाची आहे आणि इथे काम करण्याचा माझ्यासकट सर्वांनाच अधिकार आहे. माझ्यासारख्या बाहेरून आलेल्यांना इथे सन्मान मिळतो, असे कंगनाने करणला सुनावले आहेत.अलीकडेच एका मुलाखतीत कंगनाने करणच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ती अक्षरश: त्याच्यावर तुटून पडली. मी ‘वूमेन कार्ड’ आणि ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळते असे करण म्हणतो. करण कुठल्या कार्डची गोष्ट करतोय. असे म्हणून त्याने त्या प्रत्येक महिलेचा अपमान केलाय, ज्यांना या कार्डची गरज आहे. एक प्रेग्नंट महिला ‘वूमेन कार्ड’ दाखवून बसमध्ये जागा मिळवू शकते. अ‍ॅसिड हल्ला झेलणारी माझी बहीण रंगोली ‘व्हिक्टिम कार्ड’ वापरते. जेणेकरून तिला न्याय मिळावा. मी करण जोहरविरूद्ध नाही तर पुरूषी मानसिकतेविरूद्ध लढते आहे, असेही तिने सुनावले.