Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतच्या बहिणीने पुन्हा काढली भडास, NCWला म्हटले ‘फ्रॉड’!!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 14:04 IST

ऐश्वर्या राय आणि सलमान खानची खिल्ली उडवणारे मीम शेअर करून विवेक ओबेरॉय पुरता फसला. पण याचदरम्यान एक महिला मात्र विवेकच्या बाजूने उभी झालेली दिसली. ती म्हणजे, कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल.

ठळक मुद्दे विवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम्स शेअर केले होते. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

ऐश्वर्या राय आणि सलमान खानची खिल्ली उडवणारे मीम शेअर करून विवेक ओबेरॉय पुरता फसला. बॉलिवूड कलाकारांचे टीकास्त्र आणि राष्ट्रीय महिला आयोगाने बजावलेले नोटीस या सगळ्यानंतर विवेक नरमला आणि झालेल्या प्रकाराबद्दल त्याने माफी मागितली. या संपूर्ण प्रकरणात विवेक ओबेरॉयवर चहूबाजंूनी टीकेची झोड उठली. पण याचदरम्यान एक महिला मात्र विवेकच्या बाजूने उभी झालेली दिसली. ती म्हणजे, कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल. रंगोलीने ट्वीटरवर या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली भडास काढली. केवळ इतकेच नाही राष्ट्रीय महिला आयोगाला  ‘फ्रॉड’ म्हणून मोकळी झाली.

‘ फ्रॉड @IndiaMeTooआणि NCW मुळे भारतात फेमिनिज्मचा खून झाला आहे. आरोपी मोकाट हिंडत आहेत. खुलेपणाने लिंगभेदभावाचे प्रदर्शन सुरु आहे. मी हे कधीच विसरणार नाही की, राष्ट्रीय महिला आयागाने एका मोठ्या स्टारविरोधातील कंगनाची तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला होता आणि आता आता एका ‘बालिश जोक’साठी हाच आयोग मैदानात उतरला आहे. तेही अनेक बलात्काराची आणि लैंगिक शोषणाची प्रकरणे रेंगाळत पडली असताना...शेम...,’असे ट्वीट रंगोलीने केले आहे.

 सलमानने दिली प्रतिक्रिया‘भारत’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान सलमानला विवेकच्या या वादग्रस्त ट्वीटबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने त्याच्या अंदाजात उत्तर दिले. ‘मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आता तर मी आधीसारखे टिष्ट्वटही करत नाही, मग मीम्स काय बघणार? मी काम करू की, लोकांचे कमेंटस अन् मीम्स पाहत बसू? मी सोशल मीडियाकडे अजिबात लक्ष देत नाही,’ असे भाईजान तावातावात म्हणाला.

विवेकच्या ट्वीटमध्ये काय होते? विवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम्स शेअर केले होते. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण हे ट्वीट आणि हे मीम शेअर करताना त्याने केवळ एक्झिट पोलचीच नाही तर ऐश्वर्या राय बच्चन हिचीही खिल्ली उडवली होती.  विवेकने ट्वीट केलेल्या मीम्समध्ये तीन फोटो होते. यातील पहिल्या सर्वात वरच्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या राय होते. या फोटोला ‘ओपिनियन पोल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे होते. दुस-या फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत होते. याला ‘एक्झिट पोल’ असे लिहिलेले होते. तिस-या फोटोत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन व आराध्याचा फोटो होता आणि यावर ‘रिझल्ट’ असे लिहिले होते.

टॅग्स :कंगना राणौतविवेक ऑबेरॉय