Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलजीतला एन्जॉय करताना पाहून कंगना भडकली, म्हणाली - वाह भावा वाह, हा आहे लोकल क्रांतिकारी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 08:45 IST

दिलजीत नुकताच नव्या वर्षाची सुट्टी एन्जॉय करताना दिसला. हेच कंगनाला आवडलेलं दिसत नाही. तिने दिलजीतचा फोटो शेअर करत त्याला शेतकरी आंदोलनाची आठवण करून दिली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून कंगना रणौत वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. जेव्हापासून तिने ट्विरवर एन्ट्री घेतली तेव्हापासून ती कुणाला ना कुणाला टार्गेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यात शेतकरी आंदोलनावरून वाद झाला. दोघांचं हे ट्विटर वॉर चांगलंच चर्चेत आलं होतं. आता पुन्हा एकदा कंगनाने दिलजीतवर निशाणा साधला आहे. झालं असं की, दिलजीत नुकताच नव्या वर्षाची सुट्टी एन्जॉय करताना दिसला. हेच कंगनाला आवडलेलं दिसत नाही. तिने दिलजीतचा फोटो शेअर करत त्याला शेतकरी आंदोलनाची आठवण करून दिली आहे. 

दिलजीत दोसांज नव्या वर्षानिमित्ताने परदेशात फिरायला गेलाय. त्याने ट्विटरवर बर्फाचा आनंद घेणारा फोटो शेअर केलाय. हे फोटो त्याच्या फॅन्सना तर आवडले. पण शेतकरी आंदोलनाच्या मधेच अशाप्रकारे दिलजीतनं सुट्टी एन्जॉय करणं कंगनाला काही आवडलं नाही. तिने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्याला चिमटा काढलाय. कंगनाने लिहिेले की, 'वाह भावा, देशात आग लावून, शेतकऱ्यांना रस्त्यावर बसवून, लोकल क्रांतिकारी परदेशात थंडीचा आनंद घेत आहे. वाह. याला म्हणतात लोकल क्रांती'.

दरम्यान, कंगना रणौतने शेतकरी आंदोलनातील एका वयोवृद्ध महिलेबाबत अपशब्द वापरले होते. ज्यामुळे दिलजीत दोसांजने तिच्यावर टीका केली होती. इतकेच नाही तर कंगनावर अनेक सेलिब्रिटींनी टीका केली होती. सोशल मीडियावर ती ट्रोलही झाली होती. त्यानंतर तिने ट्विट डिलीट केलं होतं. पण कंगना आणि दिलजीतमधील ट्विटर वॉर बरेच दिवस रंगलं होतं. अजूनही दोघांमधील ट्विटर वॉर संपलेलं दिसत नाही. आता यावर दिलजीत काय उत्तर देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :दिलजीत दोसांझकंगना राणौतसोशल मीडिया