Join us
Daily Top 2Weekly Top 5

भगवान शिवशंकराच्या दर्शनाला पोहोचली कंगना राणौत! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 13:11 IST

 कंगना राणौत सध्या ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. यादरम्यान कंगनाने कोईम्बतूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या ध्यानलिंग आदिशक्ती आश्रमाला भेट दिली.

 कंगना राणौत सध्या ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. यादरम्यान कंगनाने कोईम्बतूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या ध्यानलिंग आदिशक्ती आश्रमाला भेट दिली.

यावेळी कंगना फिक्कट आकाशी रंगाच्या साडीत दिसली. मंदिराच्या गाभाऱ्यात तिने बराच वेळ घालवला. यावेळी ती शिवलिंगाची मनोभावे पूजाअर्चा करताना दिसली. 

यानंतर कंगनाने ईशा फाऊंडेशनच्या कोईम्बतूर येथील मुख्यालयालाही भेट दिली. येथील भगवान शिवशंकराच्या मूर्तीपुढे कंगना पोझ देताना दिसली.

कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, तिचा ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात ती राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसेल. येत्या १५ आॅगस्टला या चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे. याशिवाय कंगनाचा ‘मेंटल है क्या’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यात कंगना राजकुमार राव याच्यासोबत ्स्क्रिन शेअर करताना दिसेल.

 

टॅग्स :कंगना राणौत