Join us

ह्रतिक रोशनची एक्स मॅनेजर आता सांभाळणार कंगणाचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 13:01 IST

अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री कंगणा राणौत काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत होते.

मुंबई- अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री कंगणा राणौत काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत होते. आरोपप्रत्यारोपाच्या खेळामुळे या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला. पण आता ह्रतिक व कंगणाची कहाणी वेगळं वळण घेईल,अशी चर्चा सगळीकडे होताना दिसते आहे. याचं कारण म्हणजे ह्रतिक रोशनचं कामकाज सांभाळणारी एक्स-मॅनेजर अंजली आथा आता कंगणा राणावतचं कामकाज सांभाळणार असल्याची माहिती मिळते आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार कंगणा राणावतने ह्रतिक रोशनच्या एक्स मॅनेजरला हायर केलं आहे. 

ह्रतिक रोशनचं काम बऱ्याच वर्षापासून अंजली (अॅक्सिड एण्टरटेन्मेट) पाहत होती. पण काही कारणाने दोघांमध्ये मतभेद झाले. ह्रतिकचं कामकाज पाहणारी कंपनी त्याला कार्यक्रमाची योग्य किंमत सांगत नसल्याचं ह्रतिकला वाटलं. हेच भांडणाचं कारण झाल्याचं समजतं आहे. कंपनीला क्लाइंटकडून जास्त कमीशन मिळत होतं त्यामुळे ह्रतिकला मिळणारी रक्कम कमी असायची, या कारणामुळे दोघांमध्ये मतभेद झाले. 

यावर अंजलीला विचारला असता तीने कंगणाबरोबर काम करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंगणाने माझ्यावर विश्वास दाखविल्यामुळे मी खूप खुश असल्याचं अंजलीने म्हंटलं. कंगणाच्या ताफ्यात अंजली गेल्यानंतर ह्रतिकबद्दलच्या काही गोष्टी बाहेर येतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण कंगणाच्या टीममध्ये काम करायला सुरू केल्यानंतर ह्रतिकबद्दलच्या कुठल्याही प्रकरणावर बोलणार नसल्याचं आधीच स्पष्ट केल्याचं अंजलीने म्हंटलं.  

टॅग्स :हृतिक रोशनकंगना राणौतबॉलिवूड