Join us

कंगना बनणार स्टँडअप कॉमेडियन!

By admin | Updated: April 17, 2016 01:20 IST

कंगना रानोट खासगी आयुष्यात काही वादांना तोंड देत असली तरी व्यावसायिक पातळीवर मात्र कंगना जाम वेगाने धावतेय. सध्या ती शाहीद कपूर व सैफ अली खानसोबत ‘रंगून’मध्ये बिझी आहे.

कंगना रानोट खासगी आयुष्यात काही वादांना तोंड देत असली तरी व्यावसायिक पातळीवर मात्र कंगना जाम वेगाने धावतेय. सध्या ती शाहीद कपूर व सैफ अली खानसोबत ‘रंगून’मध्ये बिझी आहे. याशिवाय हंसल मेहतांचा ‘सिमरन’ हा कंगनाचा आणखी एक सिनेमाही पाईपलाईनमध्ये आहे. एवढे कमी की काय, म्हणून संजय दत्तच्या बायोपिकमध्ये कंगना मान्यता दत्तच्या भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा आहे. नव्या बातमीनुसार, संजय दत्तच्या बायोपिकमध्ये कंगना काम करणार असल्याची अफवा आहे. मात्र राजकुमार हिरानी यांच्यासोबत एका एक्साईटिंग प्रोजेक्टमध्ये कंगना दिसणार आहे. होय, हिरानींच्या नव्या चित्रपटात कंगना स्टँडअप कॉमेडियनच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने तयारीही सुुरू केली आहे. काही प्रशिक्षण आणि शिबिरांना ती हजेरी लावतेयं. ‘रंगून’नंतर कंगना काहीदिवस ब्रेक घेणार आहे. त्यानंतर लगेच हंसल मेहतांच्या ‘सिमरन‘चे शूटिंग ती सुरू करणार आहे.