Join us

कमल हासनसाठी थलायवाच्या 'कबाली'चं स्पेशल स्क्रीनिंग !

By admin | Updated: July 26, 2016 17:16 IST

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकमेंकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी 1980 पासून अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी वैयक्तिक जीवनात एकमेंकांशी असलेली मैत्री कायम ठेवलीय.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २६ : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकमेंकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी 1980 पासून अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी वैयक्तिक जीवनात एकमेंकांशी असलेली मैत्री कायम ठेवलीय. थलायवाच्या कबाली सिनेमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर सुपरस्टार रजनी यांनी आपल्या खास मित्रासाठी म्हणजेच कमल हासन यांच्यासाठी कबालीच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करणार आहे . याआधी कमल हासनसाठी कबालीचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. मात्र सुभाष नायडू या आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान कमल हासन यांच्या पायाला दुखापत झाली. पायाला फ्रॅक्चर असल्याने कबालीचं स्पेशल स्क्रीनिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. 
 
आता रजनीच्या कबालीला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय आणि ते अमेरिकेवरुनही परतले आहेत.त्यामुळं लवकरच कमल हासन यांच्यासाठी कबालीचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात येणार आहे. याआधी कमल हासन यांनी रजनीकांत यांचा कोच्चडियान या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे रजनीकांत यांनीही कमल हासन यांच्या उन्नायपोल ओरुवन, दशावतारम, विश्वरुपम या सिनेमांच्या स्क्रीनिंगला उपस्थितील लावली होती.