Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमल हासनची 'ती' मुलगी झळकली आमिरच्या चित्रपटात

By admin | Updated: October 21, 2016 11:15 IST

दंगल या सिनेमाचे कनेक्शन 1997 साली आलेल्या 'चाची 420' या सिनेमाशी जोडले गेले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 -  आमीर खानचा बहुचर्चित सिनेमा 'दंगल'चा ट्रेलर गुरुवारी रिलीज करण्यात आला.  काही तासांमध्ये या ट्रेलरला लाखोंच्या संख्येने हिट्स मिळाले. ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. मात्र, सिनेमातील आणखी एका गोष्टीमुळे तुमची उत्सुकता वाढणार आहे. या सिनेमाचे कनेक्शन 1997 साली आलेल्या 'चाची 420' या सिनेमाशी जोडले गेले आहे.
 
'चाची 420'मध्ये कमल हासन आणि तब्बूच्या मुलगी 'भारती रतन'ची भूमिका साकारणारी ती चिमुकली तुम्हाला आठवते आहे का?. तिच फातिमा सना शेख, आता आमीरच्या दंगलमध्ये कुस्तीपटू 'गीता फोगट' म्हणून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमामध्ये सना शेख मुख्य भूमिकेत असून ती, कोमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये कुस्तीमध्ये गोल्ड मेडल जिंकणा-या गीता फोगटच्या भूमिकेत दिसणार आहे. 
आणखी बातम्या
 
2001 साली शाहरुख खान आणि जुही चावलाचा सिनेमा 'वन टू का फोर'मध्येही ती दिसली होती. त्यानंतर 2008 साली आलेल्या 'तहा' या सिनेमामध्ये तिने 'झोया'ची व्यक्तीरेखा साकारली होती.  त्यामुळे आगामी 'दंगल' सिनेमामध्ये 'बेबी भारती' गीता फोगटच्या भूमिकेत कशी दिसणार?, हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. चिल्लर पार्टी सिनेमाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनीच या सिनेमाचेही दिग्दर्शन केले आहे. 23 डिसेंबर रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.