Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळू डॉनचा मास्टरमाइंड प्लॅन! प्राजक्ताची पॉवर key चोरून थेट कॅप्टन्सीची उमेदवारी, चाहते म्हणाले- "प्रभू एकच नंबर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 10:37 IST

प्रभूने केलेला मास्टर गेम पाहून घरातील सदस्यांसोबत चाहतेही थक्क झाले आहेत. त्याचा बदललेला गेम पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. 

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा सातवा आठवडा सुरू झाला आहे. आणि आता हळूहळू घरातील गेम आणखी मनोरंजक होत चालला आहे. घरात आणि खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धक वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसत आहेत. कॅप्टन्सी मिळवण्यासाठी काळू डॉन म्हणजेच प्रभू शेळकेने भलतीच शक्कल लढवली आहे. प्रभूने केलेला मास्टर गेम पाहून घरातील सदस्यांसोबत चाहतेही थक्क झाले आहेत. त्याचा बदललेला गेम पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. 

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एक टास्क खेळवण्यात आला होता. यामध्ये दोन टीम पाडण्यात आल्या होत्या. या टीममधून दोन टॉप सदस्य आणि दोन फ्लॉप सदस्य निवडण्यात आले. टीम ए कडून विशाल आणि अनुश्री तर टीम बी कडून प्राजक्ता आणि रुचिता यांची टॉप २ म्हणून निवड करण्यात आली होती. तर फ्लॉप २मध्ये टीम ए कडून दिपाली आणि राखी आणि टीम बीकडून सागर आणि तन्वी हे सदस्य निवडण्यात आले. यापैकी दोन टॉप सदस्यांना पावर की देण्यात आली. तर दोन फ्लॉप सदस्यांना कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद करण्यात आलं. कॅप्टन म्हणून हे सदस्य निवडण्याची जबाबदारी तन्वी कोलतेला देण्यात आली होती. तन्वीने टीम एमधून अनुश्री आणि टीम बीमधून प्राजक्ताची निवड करत त्यांना पावर की दिली. तर टीम ए मधून राखी आणि बी मधून सागरला तिने कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद केलं. 

त्यानंतर खरा गेम सुरू झाला. घराची कॅप्टन्सी मिळवण्यासाठी प्रभूने त्याचा मास्टरप्लॅन बनवला. प्रभूने मोठ्या हुशारीने प्राजक्ताची पावर की चोरली आणि स्वत:कडे घेतली. यावरुन घरात आता मोठा वाद झाल्याचं दिसणार आहे. ज्या सदस्याकडे प्राजक्ताची पावर की आहे त्याला पावर कीच्या सर्व पावर मिळणार असल्याचं बिग बॉसने जाहीर केलं. त्यानंतर प्रभूला प्राजक्ता आणि रोशन रागात बोलत असल्याचं दिसत आहे. "हा कमजोर आणि चोरटा गेम आहे", असं प्राजक्ता प्रभूला म्हणाली. मग रोशनही त्याला बोलतो. त्यानंतर मग प्रभूचाही पारा चढतो. तो म्हणतो, "मी चोरली काय करायचं ते करा". त्यानंतर घरातलं वातावरण तापलेलं दिसत आहे. 

बिग बॉसच्या घरातील हा नवा व्हिडीओ पाहून चाहते मात्र खूश झाले आहेत. प्रभूचा हा मास्टरमाइंड गेम चाहत्यांना आवडला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "प्रभू एकच नंबर", "प्रभूने गेम पालटला", "बिग बॉसने सांगितलं होतं सांभाळून ठेवा, तिला नाही जमलं ते...प्रभू ने गेम केला", "काळू डॉन पॉवर", "प्रभू कडक रे भावा", "व्वा प्रभू मजा आ गया", अशा कमेंट करत चाहत्यांनी प्रभूला पाठिंबा दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kalu Don's master plan: Stealing power key, candidacy stuns fans!

Web Summary : In Bigg Boss Marathi 6, Prabhu Shelke (Kalu Don) stole Prajakta's power key to gain captaincy candidacy. This bold move sparked controversy, with housemates and fans reacting strongly to his strategic gameplay.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६प्राजक्ता शुक्रे