आजवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसलेली कल्की कोचलीन आता वेगळ्याच रूपात दिसणार आहे. हॅप्पी एंडिंगमध्ये कल्की विनोदी भूमिकेत दिसणार असून ही तिची पहिलीच विनोदी भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. कल्की या चित्रपटात एका डेंटिस्टच्या भूमिकेत आहे, जी तिच्या बॉयफ्रेंडला जराही स्पेस देत नाही आणि नेहमीच त्याच्यावर पाळत ठेवत असते. कल्कीच्या प्रियकराच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या मते, कल्की एक प्रतिभावंत अभिनेत्री असून ती एखादी भूमिका निभावते तेव्हा ती कल्की राहत नाही, तर ते पात्र बनते. या चित्रपटात कल्की एक डेंटिस्ट आणि खट्याळ प्रेयसीच्या रूपात दिसणार आहे.
विनोदी भूमिकेत कल्की
By admin | Updated: October 16, 2014 02:30 IST