आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज करणारी आलिया भट्ट आता साऊथच्या वाटेवर निघालीय. ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. होय, ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आर आर आर’ या आगामी चित्रपटात आलिया भट्टची एन्ट्री झालीय.अनेकांचा या बातमीवर विश्वास बसणार नाही. कारण, काल-परवापर्यंत आलियाने राजमौलींच्या ‘आर आर आर’ची आॅफर नाकारली, अशी बातमी होती. पण आता बातमी एकदम खरी आहे. खुद्द राजमौली यांनीच आलियाच्या एन्ट्रीची अधिकृत घोषणा केलीय.
कन्फर्म! आलिया भट्ट निघाली ‘साऊथ’ला; साईन केला ‘RRR’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 14:33 IST
आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज करणारी आलिया भट्ट आता साऊथच्या वाटेवर निघालीय. ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.
कन्फर्म! आलिया भट्ट निघाली ‘साऊथ’ला; साईन केला ‘RRR’!!
ठळक मुद्दे ‘बाहुबली’नंतर राजमौलींचा ‘आर आर आर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत.