Join us  

तापसीनंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 9:18 AM

विविध वेबसिरीज आणि ओटीटी माध्यमांत झळकलेल्या अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलंय त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय

गेल्या काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बे सोबत गुपचुप लग्न  केलं. तापसी आणि मॅथियसच्या लग्नाची खुप चर्चा झाली. अशातच आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलंय. ही अभिनेत्री म्हणजे आरुशी शर्मा. आरुशी शर्मा हे नाव तसं नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून विविध वेबसिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर ती झळकली आहे. अशातच आरुशीने गुपचुप लग्न केल्याने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आरुशीच्या लग्नाने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय. आरुशीने कास्टिंग डायरेक्टर वैभव विशांत सोबत लग्न केलंय. आरुशीने तिच्या रिलेशनशीपची कोणतीही चर्चा केली नाही. आणि अचानक तिचे फोटो व्हायरल झाल्याने सर्वांनीच तिचं अभिनंदन केलंय. आरुशीच्या लग्नाला तिचे कुटुंबिय आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित होते. तिने गुलाबी रंगाचा लेहंगा आणि तिचा पती विशांतनेही बायकोला मॅचिंग अशी गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती.

आरुशीबद्दल सांगायचं तर.. तिला इम्तियाज अलींच्या 'लव्ह आज कल' सिनेमातून प्रसिद्धी मिळाली. पुढे जितेंद्र कुमारसोबत आरुशीने 'जादूगर' सिनेमात अभिनय केला. या सिनेमातील आरुशीची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या 'काला पानी' या वेबसिरीजमध्ये आरुशी झळकली. आरुशी आणि विशांतच्या लग्नामुळे सर्वांनी नवविवाहीत जोडप्याचं अभिनंदन केलंय. 

टॅग्स :तापसी पन्नूआरूषी शर्माबॉलिवूडइम्तियाज अलीलव आजकल