Join us

विनोदाचा तडका ‘कॅ री आॅन देशपांडे’

By admin | Updated: December 11, 2015 01:40 IST

काही नवरे किंवा महिला एका जन्मातच आपल्या साथीदाराला कंटाळतात, सात जन्म कुठे एकाच माणसाबरोबर राहणार, दोन बायका एकत्र नांदू नाही शकत,

काही नवरे किंवा महिला एका जन्मातच आपल्या साथीदाराला कंटाळतात, सात जन्म कुठे एकाच माणसाबरोबर राहणार, दोन बायका एकत्र नांदू नाही शकत, चार-चार कुठे राहणार, अशा अनेक जोक्सना सध्या सोशल मीडियावर पेव फुटले आहेत. जोक्स अपार्ट पण एक पुरुष साधारणत: किती दयावान असू शकतो, याचा काही अंदाज लावू शकता? किंवा एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल आणि त्यामुळे तिचं लग्न होत नसताना, तर एखादा विवाहित पुरुष तिच्याशी लग्न करतोय, असं चित्र कुठे पाहिलं आहे का? आणि ते पण एकदा नाही बरं... अनेकदा. नाही ना, मग आता पाहा. घाबरू नका... असं कोणी प्रत्यक्षात करायला जात नाहीये. तर तुम्ही हे पाहू शकणार आहात, ‘कॅरी आॅन देशपांडे’ या चित्रपटात. हा चित्रपट आजच संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय पाटकर, निर्माते गणेश रामदास, अभिनेता पुष्कर श्रोत्री, नृत्यांगना व अभिनेत्री मानसी नाईक, हेमलता बाणे, सीमा कदम व स्नेहल गोरे यांनी शनिवारी पुण्याच्या ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. >>> मी यामध्ये प्रमुख भूमिकेत असून, महिलांना आधार देणाऱ्या शशी देशपांडे हे विनोदी पात्र मी साकारलं आहे. आजूबाजूला घडणाऱ्या दूषित वातावरणापासून एका वेगळ्याच कॉमेडी विश्वात नेणारा, एकापेक्षा अनेक बायका करणारा आणि त्यांना मानसन्मान देऊन नांदवणारा अशा काहीशा अघटित, कल्पित घटना पाहायला मिळणारा हा चित्रपट आहे. - पुष्कर श्रोत्री, अभिनेता