Join us

प्रेमप्रकरण की नुसतीच अफवा?

By admin | Updated: November 5, 2015 01:52 IST

बॉलीवूडमधील अभिनेता अथवा अभिनेत्री कुठे डेटिंगवर जातात का, याबाबत पापाराझी नेहमीच लक्ष ठेवून असतात. असे कुठे संकेत मिळाले की मग या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होते.

बॉलीवूडमधील अभिनेता अथवा अभिनेत्री कुठे डेटिंगवर जातात का, याबाबत पापाराझी नेहमीच लक्ष ठेवून असतात. असे कुठे संकेत मिळाले की मग या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होते. परंतु अनेकदा यात अफवांचाच बाजार जास्त असतो. आताही बॉलीवूडमध्ये असाच अफवांचा बाजार गरम आहे. ज्या हॉट कपल्सना घेऊन चर्चा रंगत आहेत, ते मात्र अशा संबंधांवर जाहीरपणे काहीही बोलायला तयार नाहीत.

आलिया भट्ट - सिद्धार्थ मल्होत्रागेल्या वर्षभरापासून या दोघांना अनेक वेळा एकत्रितरीत्या पाहण्यात आलंय. बरेचदा सिद आलियाच्या घरातून बाहेर पडतानाही अनेकांना दिसलाय. आलियाचा नुकताच ‘शानदार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा नायक शाहीद कपूरनेही आलिया ही सिदशी खूपच प्रेमाने बोलत असल्याचे म्हटले होते. यांचेही खरे-खोटे देव जाणे...अर्जुन कपूर -  जॅकलिन फर्नांडीसअर्जुन कपूरचे अनेक सुंदर नायिकांशी नाव जोडले गेले आहे. २०१५ साली आयफा अ‍ॅवॉर्ड्सदरम्यान अर्जुन आणि जॅकलिन दोघे भेटले. तीन दिवसांच्या सरावादरम्यान ते जवळ आले. तथापि जॅकलिनने या सर्व अफवांचे खंडन केले आहे. ते सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत आणि ते अधिक जवळ येत आहेत, हे मात्र त्यांच्याशिवाय इतरांना अधिक स्पष्ट दिसत आहे.पुलकित सम्राट - यामी गौतमविवाहित पुलकित सम्राट हा यामी गौतमसोबत येत्या चित्रपटात काम करीत आहे. यामीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये हे दोघे बराच काळ असतात अशा अफवा आहेत. हे दोघे एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत, अगदी ब्रेकमध्ये सुद्धा हे सर्वांच्या लक्षात आले होते. पुलकित याने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासमवेत लग्न केले आहे.सलमान खान - लुलिया वान्तूररोमानियाची मॉडेल लुलिया वान्तूर ही सलमान खानची मैत्रीण असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून सांगण्यात येते. अर्पिता खानच्या लग्नसमारंभात लुलियाचा सर्वत्र वावर होता. सलमानने गर्लफ्रेंड म्हणून लुलियाची ओळख करून दिल्याचे अनेक जण सांगतात. काही दिवसांपूर्वी सलमान आणि लुलियाचा साखरपुडा झाल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठल्या होत्या. अर्पिता खानने हे चुकीचे असल्याचे म्हटले होते. सलमान खानचा लुलियासोबत लग्न करण्याचा प्लॅन असल्याचे जवळच्या मित्रांनी सांगितलंय; पण अद्याप तरी तसा मुहूर्त सापडलेला दिसत नाही.हृतिक रोशन - कंगना राणावतहृतिक सध्या सिंगल आहे. मी हा आनंदाचा काळ मजेत घालवतोय, असे त्याने काल-परवाच मीडियाला सांगितले. परंतु हृतिक खरंच सिंगल आहे का, असा प्रश्न मीडियाला पडला आहे. कारण त्याचे व कंगनाच्या प्रेमाचे किस्से अजूनही चर्चेत आहेत. ‘क्रिश ३’ या चित्रपटादरम्यान हृतिक आणि कंगना जवळ आल्याच्या अफवा होत्या. हृतिकच्या घराबाहेर कंगनाची कार उभी असल्याचे पाहण्यात आले होते. परंतु काल-परवा नीता अंबानींच्या खास पार्टीत दोघेही एकमेकांना टाळताना दिसून आले.

- sameer.inamdar@lokmat.com