ज्ॉ कलीन फर्नाडिस तिच्या पहिल्या हॉलीवूूड चित्रपटात खतरनाक स्टंट्स करताना दिसणार आहे. डेफिनेशन ऑफ फियर या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करीत असलेली ज्ॉकलीन तिचे स्टंट्स स्वत:च करणार असून त्यासाठी ती बॉडी डबल्सचा वापर करणार नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ज्ॉकलीनच्या अॅक्शन सीन्ससाठी तिच्या बॉडी डबल्सची व्यवस्था केली होती; पण ऐनवेळी तिने स्वत: ते सीन्स परफॉर्म करणार असल्याचे त्यांना सांगितले. या चित्रपटात ज्ॉकलीनचे दोन खतरनाक अॅक्शन सीन्स आहेत. डेफिनेशन ऑफ फियर हा एक थ्रिलर मूव्ही असून ज्ॉकलीन त्यात एका सायकॉलॉजी स्टुडंटच्या भूमिकेत आहे.