ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२- डिझ्नी प्रॉडक्शनचा द जंगल बुक हा हॉलिवूड चित्रपट भारतीयांच्या सर्वाधिक पसंतीस उतरला आहे. या चित्रपटानं भारतात सर्वाधिक कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 90 टक्के चालला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अवघ्या 12 दिवसांत छोट्या मोगलीनं फ्युरियस ७ आणि ज्युरासिक वर्ल्ड या चित्रपटांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. कालपर्यंत या चित्रपटानं 2 कोटी 40 लाखांची कमाई केली आहे. चीननंतर भारतात या चित्रपटानं सर्वाधिक मार्केट काबीज केलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं 1 कोटी 5 लाखांची कमाई केली आहे. डिझ्नी प्रॉडक्शनला या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळालं आहे. यावेळी शाहरुखचा सिनेमा आणि तामीळ चित्रपट थेरी स्पर्धेत होते. या चित्रपटांना द जंगल बुक हा वरचढ ठरला आहे. जंगल बुक हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
'द जंगल बुक' या हॉलिवूड चित्रपटाची भारतात रेकॉर्डब्रेक कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 18:37 IST