द हंड्रेड फूट जर्नी नावाच्या हॉलीवूड चित्रपटात जुही चावलाला संधी मिळाली तेव्हा तिला एक मोठा हॉलीवूड चित्रपट मिळाल्याची चर्चा होती; पण आता जेव्हा चित्रपट रिलीज होणार आहे, तेव्हा मात्र जुही गप्प आहे. तिचे हे गप्प राहणो आश्चर्यकारक आहे; पण त्यामागचे कारणही तसेच आहे. जुहीने या चित्रपटात ओम पुरीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. ती हीरोच्या आईच्या भूमिकेत असून तिचा फक्त एकच सीन चित्रपटात आहे. म्हणूनच ती याबाबत कोणाशी चर्चा करीत नसून प्रचारापासूनही लांब आहे.
हॉलीवूड चित्रपटात जुहीचा एकच सीन
By admin | Updated: August 8, 2014 23:31 IST