बॉलीवूडमध्ये नव्वदचे दशक गाजवणा:या जुही चावलाच्या अभिनयाची जादू आता हॉलीवूडमध्ये पाहायला मिळणार आहे. द हंड्रेड फूट जर्नी या चित्रपटातून जुही हॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात ती तिच्या मूळ वयापेक्षा 15 वर्षे जास्त वृद्ध दिसणार आहे. या चित्रपटात ती ओम पुरींच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. सूत्रंनुसार फ्रान्समध्ये रेस्टॉरंट चालवून उदरनिर्वाह करणा:या एका भारतीय कुटुंबाची कथा या चित्रपटात दाखवली जाणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग, ओप्रा विनफ्रे आणि ज्युलिएट व्लेक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लेसे हालस्ट्राम्स यांनी केले असून, संगीत ए.आर. रहमानचे आहे. हा चित्रपट येत्या
8 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}