दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा चित्रपट म्हणजे, त्यात काहीतरी विशेष असणारच हे ठरून गेले आहे. अगदी त्याप्रमाणेच त्यांच्या 'शासन' या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी बांधलेली आजच्या आघाडीच्या कलावंतांची मोट हे आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, मोहन जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत, वृंदा गजेंद्र, नागेश भोसले, मिलिंद शिंदे, किरण करमरकर अशी कलाकारांची तगडी टीम या चित्रपटात एकत्र आली आहे. हे सर्व कमी म्हणून की काय, यात डॉ. श्रीराम लागू आणि विनय आपटे या ज्येष्ठ कलाकारांचे दर्शनही होणार आहे. आता एवढे सगळे कलावंत एकाच चित्रपटात आहेत म्हटल्यावर त्याबद्दलची उत्सुकता वाढणे स्वाभाविकच आहे. राजकारण या विषयाभोवती या चित्रपटाची कथा गुंफली आहे.
आघाडीच्या कलावंतांची जुगलबंदी
By admin | Updated: January 1, 2016 03:22 IST