ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा चित्रपट जॉली एलएलबी 2नं प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. काल म्हणजेच मंगळवारी जॉली एलएलबीनं 8.5 कोटींची कमाई केली असून, आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 62.5 कोटींचा गल्ला जमवला आहे, अशी माहिती बॉक्स ऑफिस इंडिया कॉमनं दिली आहे. 10 फेब्रुवारी 2017ला शुक्रवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसमध्ये झळकला आणि अल्पावधीतच या चित्रपटानं रग्गड कमाई केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. तसेच अक्षय कुमार, हुमा कुरेशी, सयानी गुप्ता, अन्नू कपूर, कुमुद मिश्रा आणि सौरभ शुक्ला हे मुख्य भूमिकेत आहेत. 2013 मध्ये आलेल्या 'जॉली एलएलबी' या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटात अर्शद वारसी आणि बोमन इराणी यांची मुख्य भूमिका होती. 'जॉली एलएलबी'मध्ये एक होतकरु वकील हिट अँड रन केसमधील निर्णयात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच वेळी त्याच्या विरोधात केससाठी सर्वात मोठा वकील दिला जातो. जॉली एलएलबीनं सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी त्याच्यावर गुंडांकडून हल्ले करण्यात आले. 2016मध्ये प्रदर्शित झालेले एअरलिफ्ट, रुस्तम आणि हाऊसफुल ३ या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
जॉली एलएलबी 2चा 5 दिवसांत 62.5 कोटींचा गल्ला
By admin | Updated: February 15, 2017 15:50 IST