Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवधूत झाला शाहरूखच्या ‘फॅन’मध्ये सामील

By admin | Updated: February 27, 2016 03:35 IST

मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे नशीब खूप जोरावर आहे. कोणाची बॉलीवूड तर कोणाची हॉलीवूड एंट्री होत आहे. आता तर चक्क, गायक अवधूत गुप्तेच शाहरूखच्या फॅनमध्ये

मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचे नशीब खूप जोरावर आहे. कोणाची बॉलीवूड तर कोणाची हॉलीवूड एंट्री होत आहे. आता तर चक्क, गायक अवधूत गुप्तेच शाहरूखच्या फॅनमध्ये सामील झालेला दिसतो. सध्या किंग खानच्या ‘फॅन’ या चित्रपटातील जबरा हे गाणे फार चर्चेत असल्याचे दिसते. पण या गाण्याच्या स्वरूपात ‘फॅन’ या चित्रपटाचे अधिक प्रमोशन व्हावे यासाठी यशराज फिल्मने हे गाणे सहा विविध भाषांमध्ये प्रदर्शित केले आहे. यामध्ये मराठी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, बंगाली, पंजाबी या भाषांमध्ये हे गाणे हिट झाले आहे. तर जबरा फॅन हे गाणे मराठीमध्ये अवधूत गुप्तेने गायले आहे. या स्टार गायकाचे जबरा हे मराठी व्हर्जन ऐकून असेच म्हणावे वाटते, की जबरा फॅन हूँ मैैं अवधूत का!